ईडीने दाखल केलेला खटला रद्द व्हावा : खडसेंची उच्च न्यायालयात याचिका


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयामार्फत भोसरी जमीन प्रकरणात चौकशी होत असलेला खटला रद्द करण्यात यावा या संदर्भात माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ईडीने कोणतीही सक्तीची कारवाई करू नये यासाठी अंतरीम आदेशही मागितला आहे. दरम्यान या प्रकरणी सोमवार, 25 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तो पर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई ईडीने करू नये, असे अंतरीम आदेशही न्यायालयाने दिले आहे. विशेष म्हणजे खडसे यांनी ईडीने बजावलेल्या नोटीसीनंतर त्यांची साडेसहा तास चौकशी करण्यात आली व त्यांनी यंत्रणेला सहकार्य केल्याचेही मतही न्यायालयाने नोंदविले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !