नवापूरच्या भाविकांच्या वाहनाला अपघात : महिलेचा मृत्यू ; 11 जण जखमी
नवापूर : शहरातील जनता पार्कमधील भाविकांच्या वाहनाला शिर्डीच्या साईंच्या दर्शनाला जाताना अपघात झाल्याने 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाड-चांदवड रस्त्यावर मंगळवारी घडली. नवापूर शहरातील जनता पार्क परीरसरातील स्वस्तिक किराणा दुकानाचे मालक अमित शर्मा परीवारासह शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला जात असताना त्यांचा क्रूझर गाडीला अपघात झाला. अपघातात क्रूझर (क्रमांक एम.एच.39 जे.9256) रस्त्याच्या कडेला उलटल्याने सतीश शर्मा यांच्या आई मिराबाई रामचरण शर्मा (58) यांचा मृत्यू झाला तर सोबतचे 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. काही गंभीर जखमीना मालेगाव येथे हलवण्यात आले. मयत मीराबाई शर्मा यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा परीवार आहे.



