पंतप्रधान व राष्ट्रपती भवनाबाहेरील सुरक्षेत वाढ : इंटरनेट सेवा बंदचे आदेश


दिल्ली : गृह मंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, नांगलोई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपतीभवनाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र हे हिंसक आंदोलन अजून पेटू नये म्हणून अफवांना आळा बसावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून संबंधित भागातील इंटरनेट सेवा आणि टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा आज रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !