उभ्या मालट्रकचे पाच टायर डिक्ससह लांबवले


शिरपूर शहर पोलिस ठाण्यात ट्रकमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर : नवीन बांधकाम ठिकाणी उभ्या असलेल्या मालट्रकचे पाच टायर डिक्ससह अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शहराजवळ शिंगावे शिवारातील रामकृष्ण कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी ट्रक मालकाने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
शिंगावे शिवारात रामकृष्ण कॉलनीत दिनेश कमलसिंग जमादार यांच्या मालकी च्या प्लॉट नंबर 78च्या नवीन बांधकाम ठिकाणी स्वतःच्या मालकीचा माल ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.एफ.3883) हा उभा केलेला असतांना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास 10 हजार रुपये किमतीची डिझेल टाकी व 50 हजार रुपये किंमतीचे 5 टायर डिक्स सह चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी दिनेश कमलसिंग जामदार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नारायण मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !