विवाहितेचा छळ : पतीसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा


भुसावळ : पोल्ट्री फार्मच्या व्यवसाय करण्यासाठी माहेरून चार लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तरन्नूम शेख कैसर (नाचणवेल, ता.कन्नड) यांच्या तक्रारीनुसार त्यांना दोन जुळे मुले झाल्यानंतर प्रसुतीदरम्यान एकाचा मृत्यू झाल्यानंतर पतीने शिवीगाळ व मारहाण करणे सुरू केले तसेच पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी माहेरून चार लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला व पैसे न आणल्यास तलाख देईल अशी धमकी दिली तर अन्य आरोपींनी बंदुकीने गोळी मारून ठारू मारू, अशी धमकी देत छळ केला. या प्रकरणी आरोपी पती शे.कैसर शे.अकबर, सासू मेहरूनिसाबी शे.अकबर, सासरे शे.अकबर शे.अफसर, शेख अजहर शे.अकबर, नणंद अमरीन शे.अकबर, नंदोई बाबा (पूर्ण नाव माहित नाही), नणंद फरीन शे.मुजाहिद (सर्व रा.नाचणवेल, ता.कन्नड) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !