मुक्ताईनगरात राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीचा निषेध
मुक्ताईनगर : केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढकेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी तर्फे मुक्ताईनगर येथे रस्त्यावर चुल मांडून त्यावर भाकरी भाजून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, तालुकाध्यक्ष लता सावकारे आणि महिला पदाधिकारी सहभागी झाल्या.


