माथेफिरुने तीन एकर कांदा पिकाचे केले नुकसान
शिरपूर : तालुक्यातील त-हाडी येथील विशाल बालु कंरके या शेतकर्याने तीन एकरवर लावलेल्या कांदा पिकाचे अज्ञात माथेफिरूने नुकसान केल्याची घटना घडली. माथेफिरूचा तपास करून कडक कारवाई करण्यासाठी पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे शेतकरी विशाल कंरके म्हणाले. तर्हाडी येथील शेतकरी विशाल कंरके यांनी तीन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली. त्यात संपुर्ण क्षेत्रावर अज्ञात संशयित माथेफिरूने सूडबुद्धीने काहितरी अज्ञात औषधाने फवारणी करून नुकसान केल्याची घटना घडली आहे यामुळे परीसरातील शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अगोदरच कांदा पिकावर वातावरण आणि रोगराई मुळे संकट आले असतांना शेतकर्याने कसेतरी पीक जोमात वाढविले पण आता अज्ञात माथेफिरुमुळे लाखोंचे नुकसान झाल्याने सदर शेतकरी हवालदिल झाला आहे. अज्ञात माथेफिरू कडून अशाप्रकारे नुकसान होत असल्याने परीसरातील शेतकरी चिंतित झाले असुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.द रम्यान शेतपीकाची नुकसान करणार्या माथेफिरूचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

