नवापूरच्या बर्ड फ्लूचे हरीयाणा कनेक्शन !
स्वस्तात मिळणार्या कोंबड्यांनी वाढवली बाधा : एका दिवसात 21 हजार पक्षी नष्ट
नवापूर : तालुक्यातल्या चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लू अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तब्बल पंधरा वर्षांनी नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा बर्ड फ्लूच्या आठवणत ताज्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे हरीयाणात स्वस्तात कोंबड्या मिळत असल्याने टेंपोभर कोंबड्या आणल्यानेच बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची माहिती आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सकाळपासुन नवापूर परीसरात दाखल झाली असून शेकडो अधिकारी आणि कर्मचारी युद्ध स्तरावर कामाला लागले आहेत
शास्त्रोक्त पद्धत्तीने विल्हेवाट
मागच्या आठवड्या्यात नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये प्रमाणापेक्षा अधिक कुकुटपक्षांच्या मृत्यु झाल्याने जवळपास चार पोल्ट्री फार्म मधील अहवाल तपासणी कामी भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्याने चार पोल्ट्री फार्म मधील जवळपास चार लाख कोबड्यांची कलिंग करून शास्रोक्त पद्धतीने खड्डे करून विविध प्रकारचे औषधी चा उपयोग करत प्रशासनाच्या वतीने दफन करण्याची सुरुवात झाली आहे.तर या फार्मच्या परीसरातील 12 अन्य पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोंबड्या देखील धोकादायक क्षेत्रात समावेश झाला आहे. एकट्या नवापुर तालुक्यात 22 पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास साडे नऊ लाख कुकुटपक्षी आहेत. या निर्णयाने कुकुटपालन व्यायसायीकांचे मात्र कोट्यवधींचे नुकसान होणार असून 2006 च्या बर्ड फ्लू नंतर कसातरी उभारी घेत असलेला हा व्यवसाय पुन्हा नष्ट होणार आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन नवापुर तालुक्यातील अंडी, कोंबडी मांस विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. तर नवापुर तालुक्यात कोबड्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसात पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले आहेत

अल्प पोल्ट्रीचे आज अहवाल घैणार
उर्वरित 18 ते 20 पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे अहवाल आज घेण्यात येणार असून तपासणी साठी भोपाळ येथे पाठवून रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यास किलिंग ऑपरेशनला सुरुवात करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली आहे. प्रशासनाकडून एक पक्षी मागे 90 रुपये मोबदला देणार असल्याची माहिती पोल्ट्री असोसिएशन अध्यक्ष आरीफ बलेसरीया यांनी दिली. प्रशासनाच्या मोबदल्यावर नाराजी व्यक्त करत आम्हाला एक पक्षी मोठा करण्यासाठी जवळपास 400 रुपये खर्च येत असल्याने सदर मोबदला मिळणार असला तरी आमच्या व्ययसायीकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याची माहिती पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ बलेसरीया यांनी दिली.
21 हजार पक्षी नष्ट
नवापूर पोल्ट्रीतील 22 पोल्ट्रीचे अहवाल तपासणीला जाणार असुन डायमंड पोल्ट्रीतील दोन शेड मधील 21 हजार कुकुट पक्षी नष्ट करण्यात आल्याची माहीती देण्यात आली. दरम्यान बाबत चिकन मटण विक्री व्यवसाय मध्ये सन्नाटा पसरला आहे हा व्यवसाय त्यांच्या ठप्प झाला असून उलाढालीवर त्याच्या परिणाम आज जाणवत होता.
चिकन व अंडी विक्रीला मनाई
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने नगरपालिका प्रशासनाने शहरातील 45 दुकानदारांना व चिकन अंडी विक्रीला मनाई केले आहे. पोल्ट्री फार्म ची अंडी चिकन पक्षी पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्म च्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून पोल्ट्री फार्मवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
अशा आहेत उपाययोजना
नवापुरात पशुसंवर्धन विभागाची 13 पथके तळ ठोकून आहेत व इतर वरीष्ठ अधिकारी तेथे थांबून आहेत 13 पथकामध्ये प्रत्येकी पथकात एक पशुधन अधिकारी एक सहाय्यक व पर्यवेक्षक अधिकारी व दोन ते तीन वर्ग चारची कर्मचारी यांचा समावेश आहे पथकाकडून रोज सकाळ व सायंकाळी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जात आहे त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. के.टी. पाटील यांनी दिले.
बर्ड फ्लूचे हरीयाणा कनेक्शन
काही पोल्ट्री व्यावसायिकांनी हरीयाणातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रांमधून स्वस्तात हजारोच्या संख्येने टेम्पो भरून कोंबड्या आणल्या आणि त्यापासून नवापूरमध्ये कोंबड्यांना या आजाराची लागण झाल्याची माहिती शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या भेटीदरम्यान व्यवसायिकांनी दिली. या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी आणि डायमंड पोल्ट्रीमध्ये कुक्कुड पक्षांना आजाराची लागण कशी झाली याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.


