पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
तर्हाडी येथील पतीविरोधात तालुका पोलीसात गुन्हा
जळगाव : व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी शहरातील वाघ नगर येथील विवाहितेचा छळ करणार्या धुळे जिल्ह्यातील तर्हाडी, ता. शिरपूर येथील पती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छळ असह्य झाल्याने गुन्हा दाखल
जळगाव शहरातील वाघ नगरातील माहेर असलेल्या पुजा उमेश दुसाने (25) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील तर्हाडी, ता.शिरपूर येथील उमेश सोमनाथ दुसाने यांच्याशी एप्रिल 2014 मध्ये विवाह झाला आहे. सुरूवातीचे सहा महिने चांगले गेले. त्यानंतर लग्नात हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून 5 लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची मागणी पुर्ण न झाल्याने पती उमेश दुसाने याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. हा शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगावला माहेरी 6 फेब्रुवारी 2021 रोजी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पती उमेश दुसाने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे.



