भाजपाचे जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीत
रावेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात येण्यापूर्वीच राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले आहे. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे यांनी भाजपा सोडुन रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार अरुण पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तायडे भाजपाकडून एक टर्म पंचायत समिती सदस्य तर तीन टर्म जिल्हा परीषद सदस्य होते. भाजपाकडून ते अडीच वर्ष जिल्हा परीषदेचे अध्यक्षदेखील होते.


