बनावट रेशन कार्ड प्रकरणी त्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबीत
रावेर : बनावट रेशन कार्ड प्रकरणी केर्हाळा बु.॥ येथील स्वस्थ धान्य दुकानाचा परवाना अखेर निलंबीत करण्यात आला असून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी याबाबत आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यात बनावट रेशन कार्ड प्रकरण चांगलेच गाजत असून शेती खरेदीसाठी बनावट रेशनकार्ड तयार करून खरेदीसाठी पुरावा म्हणून वापर केल्याने केर्हाळा येथील रेशन दुकानदार डिगंबर बाविस्कर यांचा स्वस्त धान्य दुकानाचे परवाना अखेर निलंबीत करण्यात आला आहे. शेतकरी नसतांना शेती खरेदीसाठी तात्कालीन नायब तहसिलदार व अव्वल कारकुन यांच्या बनावट सह्या व शिक्क्यांचा वापर करून बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती.
अटी-शर्तीचा भंग केल्याने दुकान सस्पेंड
न्यायालयाच्या आदेशावरुन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी या संदर्भात अहवाल मागविला होता. यात महाराष्ट्र अनुसूचित वस्तु वितरण विनिनियमन आदेशातील अटी-शर्तीचा भंग केल्याचे आढळून आल्याने त्यांच्या धान्य दुकानाचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे.



