करवंद गावात जुगार अड्ड्यावर धाड
हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त : सहा जणांवर गुन्हा दाखल
शिरपूर : तालुक्यातील करवंद गावात गोपनिय माहितीवरून शहर पोलिसांनी छापा टाकत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 6 जणांवर गुन्हा दाखल केला. करवंद गावातील करवंद गावात आनंदवाडी रस्त्यावर पत्त्यांवर हारजीतचा खेळ खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले. आरोपी अमोल वामन पाटील, सतिष ज्योतिसिंग भिल, शेख याकुब शेख युसूफ, राकेश रमेश पाटील, सुभाष पोपट पाटील हे पत्त्यांवर हार-जीतचा खेळ खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून पत्ते व इतर मुद्देमाल असा एकूण 10 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्वप्नील पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

