शेतीच्या हिस्से वाटणीचा वाद : वृद्धेस तापी नदीत फेकण्याची धमकी
शिरपूर : तालुक्यातील सावळदे येथे शेतीच्या हिस्सेवाटणी वरून वृद्ध आजीस तापी नदीत फेकण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी वृद्ध आजीने नातवाविरुद्ध शिरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नातवाविरुद्ध गुन्हा दाखल
सुमनबाई देवराम कोळी (65, रा. नवाप्लॉट, सावळदे) या वृद्ध महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मोठा मुलगा मयत झाला असून त्याचा मुलगा भरत रवींद्र कोळी (26) हा शेजारीच राहतो. तो नेहमी शेतीच्या हिस्सेवाटणी वरून तापी नदीच्या पुलावरून फेकून देण्याची धमकी देत शिवीगाळ तसेच गळा दाबून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून नातू भरत रविंद्र कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्तेसा करीत आहेत.


