हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद : एकावर काठीसह ब्लेडने हल्ला


शिरपूर : शहरातील वाल्मिक नगर मध्ये हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाल्याने काठी व ब्लेड ने वार करीत एकास जखमी केल्याची घटना शहरातील वाल्मिक नगरात शनिवार, 6 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाचण्यावरून उफाळले भांडण
शहरातील वाल्मिक नगर मध्ये लग्न कार्यात हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या किरकोळ भांडणातून भिका धनगर पूर्ण नाव माहीत नाही, नितीन भिका धनगर, भुर्‍या धनगर पूर्ण नाव माहीत नाही (सर्व रा.वाल्मिक नगर) यांनी फिर्यादी गोपाल बापू यास हाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. मारहाणीत गोपाल बापू कोळी याच्या उजव्या हातावर ब्लेडने वार करण्यात आले. गोपाल बापू कोळी याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस किरण बागुल करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !