सहा विशेष गाड्यांचा आगाऊ आरक्षण कालावधी आता तीन महिन्यांवर
भुसावळ : रेल्वेने यापूर्वी निवडक अशा विशेष गाड्यांमध्ये तिकिट बुकिंगसाठी आगाऊ आरक्षण कालावधी (अॅडव्हान्स रीझर्वेशन पीरियड-एआरपी) म्हणून 10 दिवसांची घोषणा केली होती परंतु आता दिनांक 10 फेबु्रवारीपासून सहा गाड्यांसाठी हा कालावधी 120 दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाड्यांचा वाढवला कालावधी
07415 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-तिरुपती विशेष गाडी, 07618 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हूजुर साहिब नांदेड विशेष गाडी, 02729 पुणे-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी, 02236 लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद विशेष गाडी, 07613 पनवेल-हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी व 02766 अमरावती-तिरुपती उत्सव विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. 120 दिवसांच्या अॅडव्हान्स आरक्षण कालावधीसह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग 10 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेत स्थळावर सुरू होणार आहे.


