सांगोला-आदर्श नगर नवी दिल्ली दरम्यान द्वि-साप्ताहिक किसान रेल चालविणार
भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे 6 फेब्रुवारीपासून सांगोला ते आदर्श नगर, नवी दिल्ली आणि आदर्श नगर, नवी दिल्ली ते दौंड दरम्यान द्वि-साप्ताहिक किसान रेल्वे सुरू केली आहे. ट्रेन क्रमांक 00101 किसान रेल दर मंगळवार आणि शनिवार, 6 ते 27 फेब्रुवारी दरम्यान सांगोला येथून 4.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी 1.30 वाजता आदर्श नगर, नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक 00102 किसान रेल प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी 8 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आदर्श नगर, नवी दिल्ली येथून 11 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 4 वाजता दौंड येथे पोहोचेल. या गाडीला कुर्डुवाडी, दौंड, मनमाड, भुसावळ, इटारसी, झांसी आणि हजरत निजामुद्दीन स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
या गाडीला सांगोला येथून तीन पार्सल व्हॅन व कुर्डूवाडी येथून एक सामानसह गार्ड ब्रेक व्हॅन, तीन पार्सल व्हॅन आणि 18 पार्सल व्हॅन जोडण्यात येईल. भुसावळ येथून पार्सल लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्या ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांनी ह्याची नोंद घ्यावी व संधीचा फायदा घ्यावा अथवा पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


