काँग्रेसचे जिल्हा सचिव अपघातात ठार


मुक्ताईनगर : बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजाजवळ चारचाकीला ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुक्ताईनगर येथील काँग्रेस जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईल खान यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. मंगळवार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री 9.15 वाजता हा अपघात घडला. खाजगी काम आटपून औरंगाबाद येथून मुक्ताईनगरकडे चारचाकीने आसीफ खान यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, अ‍ॅड.संतोष इंगळे (मेळसांगवे) हे परतीच्या प्रवासात असताना सिंधखेडराजाजवळ भरधाव ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने खान यांचा मृत्यू झाला तर सोबतचे दोघे गंभीर जखमी झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !