भुसावळात घरफोडी : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : अवैधरीत्या घरात प्रवेश करून 30 हजारांची रक्कम लांबवल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी इमरान शेख गुलाम रसुल (31, रा.15 बंगला, क्वॉ.नं आर.बी.1/980-स, ी भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी शहरातील तहसील कार्यालयाच्या परीसरातून अटक केली आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारीसोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, अक्षय चव्हाण, कृष्णा देशमुख, रवींद्र तायडे आदींनी केली. तपास सहा.निरीक्षक कृष्णा भोये, रवींद्र तायडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !