जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 29 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 57 हजार 467 वर : आतापर्यंत 55 हजार 729 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1366 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे 29 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 467 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 729 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 366 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, गुरूवारी एकाच दिवशी 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरूवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 22
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 00
अमळनेर 01
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 01
जामनेर 00
रावेर 02
पारोळा 01
चाळीसगाव 02
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00


24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 89 वर्षीय पुरूषाचा व बोदवड तालुक्यातील 62 वर्षीय पुरूषाचा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !