गिरीश महाजनांच्या दुर्लक्षानेच पाडळसरे प्रकल्प रखडला
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे टीकास्त्र
जळगाव : गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. मात्र तरीही त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प रखडला, असा आरोप माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. प्रकल्पस्थळी त्यांनी उपस्थिती देत माजी मंत्री महाजनांचा समाचार घेतला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.


