कोरोना काळातील वीज बिल माफ करावे


भाजपा शहराध्यक्षांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांचे वीज कंपनीला निवेदन

भुसावळ : कोरोना काळातील वाढीव वील बिलांमध्ये सुट मिळवून अवाजवी वीज बिले कमी करण्यासाठी मागणीसाठी भाजपाचे नूतन शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज कंपनी अधिकार्‍यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. महावितरणने राज्यातील 76 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावली असून चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणार्‍या महावितरण कंपनीच्या निषेधार्थ शहर भापजा व इतर शाखांच्यावतीने विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करुन विज बिल सरसकट माफ करण्याची मागणी करण्यात आल.

वाढीव वीज बिलांद्वारे नागरीकांची थट्टा
कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्याचे आर्थिक चक्रे मंदावली होती, त्यामुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित चुकत गेले. या काळात शासनामार्फत नागरिकांना दिलासा देण्यासंबंधी जनहितार्थ काही घोषणा होण्याची गरज होती मात्र तसे न होताबिज कपनीद्वरे जनतेला वाढीव वीज बिले देत नागरिकांची थट्टा चालविली असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.


या मागण्यांचा निवेदनात समावेश
वीज कंपनीचने वीज बिलाची दरवाढ रद्द करावी, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, चुकीचे वीज बिले लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी, कोरोना काळातील वीज बिले सरसकट माफ कराणे, शेती पंपांसाठी 24 तास वीज सेवा द्यावी. या मागण्यांवर सहानुभुतीपूर्वक विचार करुन त्रस्त झालेल्या नागरीकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती
वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सरचिटणीस दिलीप कोळी, सरचिटणीस पवन बुंदेले, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, खुशाल जोशी, राजु खरारे, अर्जुण खरारे, अथर्व पांडे, संजय बोचरे, संदीप सुरवाडे, बिसन गोहर, लक्ष्मण सोयंके, शिशिर जावळे, अजय नागराणी, चेतन बोरोले, सागर जाधव, प्रशांत भट, नंदकिशोर बडगुजर, प्रसन्ना पांडे, विशाल जंगले, सतीष सपकाळे, अजय भोळे, रमाशंकर दुबे, दिनेश दोदानी, नायण रणधीर, नगरसेवक प्रा. दिनेश राठी, युवराज लोणारी, सचिन नवगाळे, सुनील अग्रवाल, नितीन वाघोदे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, राहुल तायाडे आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !