भुसावळातून दुचाकी लांबवली
भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची घटना 10 रोजीस सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी जितेंद्र केशव बोरोले (42 चिनावल, ता.रावेर, ह.मु.मानकबाग, भुसावळ) यांनी 10 रोजी सायंकाळी 5.30 ते 5.45 सुमारास 20 हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटीना (एम.एच.19 सी.पी.8395) पंचमुखी हनुमान मंदिरासमोर लावल्यानंतर ते कामानिमित्त बाहेर गेल्याने चोरट्याने दुचाकी लांबवली. एएसआय सुरेश महाजन यांनी गुन्हा दाखल केला. तपास हवालदार जगन सोनवणे करीत आहेत.

