आढावा राष्ट्रवादीचा चर्चा माजी खडसे-पाटलांच्या गुप्तगुची
दहा वर्षानंतर भेटीचा जुळून आला योगायोग : आगामी निवडणुकीत नेत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
रावेर : फैजपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्या गुप्तगु करतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुमारे दहा वर्षानंतर खडसे-पाटील समर्थकांना असलेला अपेक्षित भेटीचा योग राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात जुळुन आल्याने भविष्याच्या राजकारणात ही नांदी असल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांचे आहे.
चर्चेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी रावेर मतदार संघातुन दोन वेळेस भाजपाकडून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. मराठा समाजातून येणार्या माजी आमदार पाटील यांचे रावेरसह आजु-बाजूच्या तालुक्यावर प्रचंड प्रभाव आहे. भाजपामध्ये असतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी असलेले मतभेद सर्वश्रृत असतांना 2009 च्या विधासभा निवडणुकीत विद्यमान आमदार असतांना भाजपाकडून पाटलांचे तिकीट कापण्यात आल्याने पाटील यांनी नाराज होऊन भाजपाला रामराम केला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या सर्व गोष्टीना दहा वर्षाच्या वर कालावधी उलटला आहे.त्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुध्दा भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला पाटील-खडसेंची गुप्तगु आगामी निवडणुकीची नांदी मानली जात आहे व दोघांचे चर्चा करतांनाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

वर्षभरात निवडणुका ः भूमिकेकडे लागले लक्ष
आगामी वर्षभरात रावेर कृषी उपन्न बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परीषद, पंचायत समिती, विकासो आदी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात होवू घातल्या असताना माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्यात होत असलेली गुप्तगु चर्चेचा विषय झाला आहे.

