24 वर्षीय युवकाची आत्महत्या


शिरपूर : शहरातील 24 वर्षीय युवकाने स्वतःच्या राहत्या घरात दुपारी गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र शांताराम माळी (24) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहत्या घरात केली आत्महत्या
शहरातील सुलोचना नगर येथील देवेंद्र शांताराम माळी हा युवक आपल्या राहत्या घरात 15 फेब्रुवारी दुपारी चार वाजता गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यास त्याचा आतेभाऊ सुनील साहेबराव माळी यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.अहिरे यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय प्रवीण पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अशोक धनगर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !