हिस्से वाटणीवरून भावाकडून बहिणीला मारहाण
शिरपूर : हिस्से वाटणीवरून आई-बहिणीला शिवीगाळ करीत भावाकडून बहिणीला मारहाण करण्यात आल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भाटपुरा गावात घडली. पीडित बहीणीला दुखापत झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सदर पीडित बहिणीच्या जबाबावरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावाविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी हिराबाई बन्सीलाल चव्हाण (55) या महिलेने उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबनुसार आज दि.15 फेब्रुवारी रोजी दुपारी आई गोकुळबाई व मोठा भाऊ विनायक देवरे असे घरी बसलो असतांना भाऊ मुरलीधर देवरे हा जवळ येत हिस्सा वाटणी वरून आईसोबत भाडंण करू लागला असता त्याला आई आणि मी कुठे राहू असे सांगितले.असता त्याला राग आल्याने मला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली असता आई व भावाने मध्यस्थी करीत भांडण सोडविले. या मारहाणीत जबर मार लागल्याने आई भावाने उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले.याप्रकरणी बहिणीच्या जबाबावरून शहर पोलिस ठाण्यात भावाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हा पुढील तपासासाठी थाळनेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे


