पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय नाशिक एसीबीच्या जाळ्यात


नाशिक एसीबीच्या कारवाईने उडाली खळबळ : 300 रुपयांची लाच भोवली

जळगाव : पारोळा ते अमळनेर प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन धारकावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 300 रुपयांची लाच स्वीकारणार्‍या लाचखोर सहाय्यक फौजदार जगदीश विनायक पवार यांना नाशिक एसीबीच्या पथकाने शनिवारी सायंकाळी उशिरा लाच स्वीकारताच अटक करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा सापळा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, प्रकाश महाजन, गरूड, गांगुर्डे यांनी यशस्वी केला.

अवैध वाहतूक ऐरणीवर
जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावनजीक पपई वाहतूक करणारा ट्रक उलटून तब्बल 15 जणांचे जीव गेल्यानंतर जिल्ह्यात अवैध वाहतूक थांबलेली नाही हेदेखील विशेष! पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे किती जणांचे आणखी बळी जाणार ? असा प्रश्‍न जनता आता उपस्थित करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !