कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक : 52 गुरांची केली सुटका


थाळनेर पोलिसांची शिरपूर-चोपडा रस्त्यावर कंटेनरवर धडक कारवाई

शिरपूर : तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी शिरपूर -चोपडा रस्त्यावर रात्री गस्त घालीत असताना तोंदे गावाजवळ अचानक पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान वाहन तपासणीत जनावरांची वाहतूक करणारा एक कंटेनर आढळून आला. थाळनेर पोलिसांनी 52 जनावरांची सुटका करीत जवळपास 17 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला घटनास्थळावरून तीन संशयीत पसार झाले.

52 जनावरांची सुटका
थाळनेर पोलिसांच्या पथकाने शिरपूर-चोपडा रस्त्यावर तोंदे गावाजवळ पहाटे साडे चार वाजेदरम्यान वाहन तपासणीत कंटेनर (क्रमांक यूपी -27 टी.2672) यास थांबवून चौकशी करून तपासणी केली असता कंटेनर मध्ये 52 गोवंश जनावरे आढळून आले. आयशरमधून गोवंश जनावरांची अवैध व अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने कंटेनरमधून 52 गोवंशीय जनावरांची सुटका केली. जनावरे सावेर येथील गोशाळेत पाठविण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पीएसआय नवनाथ रसाळ, प्रकाश मालचे, कृष्णा पावरा, उन्मेष आळनडे यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !