शिरपूर शहरातील 32 वर्षीय युवक बेपत्ता


शिरपूर : शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल परीसरातून 32 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याने शहर पोलीस ठाण्यात युवक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल परीसरातील बिकानेर स्वीट दुकानातील दुर्गसिंग जगदीश राजपुरोहित (32) हा गेल्या 18 फेब्रुवारीपासून राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला. त्याचा सर्वत्र व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यामुळे त्याचा भाऊ राजुसिंग जगदीश राजपुरोहित याने दुपारी शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !