भुसावळात चार दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत


आजदेखील होणार पाणीपुरवठा तर अन्य भागात बुधवारी येणार पाणी

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणामुळे नाहाटा महाविद्यालयाजवळ पाईप लाईन फुटल्याने या भागातील पाणीपुरवठा मंगळवारपासून विस्कळीत झाला होता. तब्बल चार दिवसांच्या प्रयत्नानंतर लिकेज दुरुस्ती झाली असून शनिवारी देना नगर, चिकूचा मळा, गणराया विहार आदी भागात चार तास पाणीपुरवठा करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. रविवारीदेखील उर्वरीत भागात पाणीपुरवठा होणार असून अन्य भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या भागात बुधवारी पाणीपुरवठा
शनिवारी पहाटे पंपींग सुरू झाल्यानंतर काही भागात पाणीपुरवठा झाला तर दिनदयाल नगर, सिंधी कॉलनी, बद्री प्लॉट, कन्हैयालाल नगर, श्रीराम नगर, वांजोळा रोड परीसर, नंदनवन कॉलनी, बोंडे कटर परीसर, तुळशीनगर, प्रोफेसर कॉलनी, बंब कॉलनी, गंगाराम प्लॉट, आनंद नगर, हुडको कॉलनी, रामेश्वर नगर, पंचशील नगर, महेशनगर, यशवंत कॉलनी, श्रध्दा नगर, अमरनाथ नगर, पंढरीनाथ नगर, हिरा नगर आदी भागात मंगळवार अथवा बुधवारी पाणीपुरवठा होईल. दरम्यान, रविवारी शहरातील लक्ष्मी नारायण नगर, पाटील मळा, रामदेव बाबा परीसर, तळेले कॉलनी, नेमाडे कॉलनी, गौसिया नगर, बजाज बिल्डींग, खडकारोड आदी भागात पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सभापती किरण कोलते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !