कोरोना जनजागृतीसाठी जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा
वरणगाव : जागतीक महिला दिनानिमित्त महिलांसाठी वरणगाव येथे आनंद महिला फाऊंडेशन, पोलिस स्टेशन वरणगाव व रोटरी क्लब ऑफ, भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिलांनी घरासमोरची साफसफाई करून कोरोनाविषयक जनजागृती करणारी सुरेख व सुबक रांगोळी काढून दोन मिनिटांचा व्हीडिओ व दोन फोटो आयोजकांच्या व्हॉटस्अॅपवर पाठवायचे आहेत. सायंकाळी दारात दीप रोषणाई करावयाची आहे तसेच सॅनिटायझर, साबण याचे महत्वदेखील विषद करायचे आहेत. विजेत्यांना आयोजकांकडून बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


स्पर्धेत सहभागाचे आवाहन
या स्पर्धेत जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी 7744034364, 9146082396, 9146166635, 8177969759 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वरणगाव पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, आनंद महिला फाऊंडेशनच्या प्रतिभा तावडे, सुरेखा देवरे, लक्ष्मी बैरगी, श्रध्दा गायकवाड, जयश्री महाजन, शीला पाटील, राजश्री जैन, वैशाली किनंगे, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅॅलीचे प्रेसीडेंट सुधाकर सनंसे, प्रोजेक्ट सेक्रेटेरी संजय भटकर यांनी केले आहे.
