भुसावळात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील टी.आर.एस.शेड.एम.ओ.एच.मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशिष्ट वयानंतर महिलांमध्ये सांधेदुःखी आणि हाडांच्या दुखण्याच्या समस्या निर्माण होत असतात पण त्यावर आधीच योग्य उपचार झाले तर मात करता येते. महिला कर्मचार्‍यांच्या निरोगी जीवनासाठी हाडांची घनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भुसावळमधील डॉ.सुवर्णा गाडेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही तपासणी केली. त्यावेळी आरोग्य विषयक मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन त्यांनी महिला कर्मचार्‍यांना केले. शिबिरासाठी सिनी डीईई टीआरएस हिमांशू नामदेव, डीईई टीआरएस सौरभ गोयल यांचे मार्गदर्शन लाभले. वरीष्ठ कल्याण निरीक्षक दीपा स्वामी, श्रीकांत सूर्यवंशी यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !