अवैध वाळू वाहतूक : यावलमध्ये कारवाई


यावल : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल प्रशासनाने जप्त केल्याने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावलचे तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळच्या सुमारास यावल शहरालगत असलेल्या हडकाई-खडकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे ट्रॉली (क्रमांक एम.एच.डब्ल्यू.9076) द्वारे गौण खनिजाची वाहतूक होत असल्याने यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी,परसाडे येथील तलाठी समीर तडवी , कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे, तहसीलदारांचे वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !