भालोद महाविद्यालयात मतदार नोंदणी विशेष अभियान
भालोद : कला व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे मतदार नोंदणी विशेष अभियान जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आले. हे अभियान फक्त महिलांसाठी होते. एकूण 19 विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरले व जवळपास 27 विद्यार्थिनींनी ऑनलाइन फॉर्म भरले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या व विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले. त्याला प्रतिसाद म्हणून हे अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी डॉ.अजय कोल्हे, प्रा.मुकेश चौधरी, प्रा.सुनील नेवे, डॉ.जतीन मेढे, डॉ.दिनेश पाटील, डॉ.वर्षा नेहेते, प्रा.मीनाक्षी वाघूळदे, प्रा.मोहिनी तायडे उपस्थित होत्या. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्यातर्फे या विद्यार्थिनींनी मतदार नोंदणी केली त्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

