अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना विशेष महानिरीक्षकांनी दिले नियुक्तीपत्र


धुळे : पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांना पोलिस अंमलदार पदावर नियुक्ती देण्याचे निर्देश असल्याने धुळे घटकाच्या आस्थापनेवर कोविडमुळे मयत झालेल्यांच्या वारसांना पोलिस शिपाई पदाची 2020 ची भरती आयोजित करून पाच पात्र उमेदवारांना नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याहस्ते बुधवारी धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !