आश्रय फाऊंडेशनकडून महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान
यावल : जागतिक महिला दिनानिमित्त आश्रय फाऊंडेशनच्या वतीने महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरूपात 12 आशा स्वयंसेविकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोना काळात आपले आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करून आपला जीव धोक्यात घालून करीत असलेल्या मानवजातीची सेवा करणार्या यावल तालुक्यातील आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचा आश्रय फाउंडेशन यावल-रावेरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. डॉ.जागृती फेगडे व डॉ.स्नेहल जावळे यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र देऊन आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व डॉ.प्रशांत जावळे उपस्थित होत. लवकरच तालुक्यातील 100 आशा स्वयंसेविका आणि आरोग्यसेविका यांचा गौरव करून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

