यावल पंचायत समीतीच्या उपसभापतीपदी भाजपाचे योगेश भंगाळे


यावल : पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवड नुकतीच झाली. भाजपाचे योगेश दिलीप भंगाळे यांची ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली.काँग्रेसकडून कलिमा तडवी या उमेदवार होत्या. दोघांनाही समसमान मते मिळाल्याने निवड ईश्वर चिठ्ठीने करण्यात आली. प्रेम देवरे या दहा वर्षीय मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार होते. गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी सहकार्य केले.

रीक्त पदासाठी निवड
पंचायत समितीमध्ये भाजपा व काँग्रेसचे प्रत्येकी चार-चार सदस्य आहेत. उपसभापती दीपक पाटील यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रीक्त पदी उपसभापती पदाची निवड करण्यात आली. मावळते उपसभापती दीपक पाटील यांचीही निवड ईश्‍वर चिठ्ठीने करण्यात आली होती. काँग्रेसच्या कलिमा तडवी व सर्फराज तडवी यांनी प्रत्येकी एक तर भाजपाच्या वतीने योगेश भंगाळे यांनी अर्ज दाखल केले होते. दुपारी निवडीच्या झालेल्या सभेत काँग्रेसचे सर्फराज तडवी यांनी आपला अर्ज माघारी घेतला.


यांची होती उपस्थिती
सभेस सभापती पल्लवी चौधरी, मावळते उपसभापती दीपक पाटील, काँग्रेसचे गटनेते शेखर पाटील, उमाकांत पाटील, योगेश भंगाळे, लक्ष्मीबाई मारे, कलिमा तडवी, सर्फराज तडवी उपस्थित होते. निवडीनंतर भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, डांभुर्णीचे सरपंच पुरूजीत चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, अतुल भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !