भुसावळ रेल्वे स्कूलला चार सायकल भेट
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबईतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रेल्वे स्कूल भुसावळला चार सायकल्स भेट देण्यात आल्या. ज्या विद्यार्थीनींकडे सायकल नाही त्यांना शाळेच्या वेळेत सायकल शिकून त्याचा त्यांना लाभ घेता येणार आहे. खेळाच्या तासाला त्याचा लाभ घेता येईल. मुंबई येथे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या हस्ते व मुंबई महिला कल्याण संघटन अध्यक्ष रेली मित्तल यांच्या उपस्थितीत शाळेचे प्रतिनिधी म्हणून स्वाती चतुर्वेदी उपप्राचार्य, अवर लिपिक बी.एल.मीना, विद्यार्थिनी प्रतिनिधी गुंजन श्रीवास्तव, सृष्टी गवळी यांना सायकल सुपूर्द करण्यात आल्या. मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, अपर मंडल रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे आणि रेल्वे अधिकारी यांनी प्राचार्य सतीश कुलकर्णी तसेच शिक्षक-शिक्षकत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

