भुसावळातील दीनदयाल नगरात आशा वर्करांचा सत्कार
भुसावळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य स्वामिनी महिला वस्ती स्तर संघ, दीनदयाल नगरात बचत गटाच्या महिला वस्ती स्तर संघाने कोरोना काळात दीनदयाल नगरात कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या आशा वर्कर स्वाती हिरालाल रावते, सारीका बडे, कल्पना मैलगीर, रेखा कोलते, तसेच अंगणवाडी सेविका मंगला सातव व मदतनीस नीता रावते यांचा सत्कार नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास शशिकला ठोंबरे व समुदाय संघटक अलका शिरसाठ, हेमलता पावसे, रोहिणी फिरके उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात स्वामिनी वस्ती स्थर संघाच्या अध्यक्ष कविता ठाकूर व त्यांच्या वस्ती संघातील पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला.

