उन्हापासून बचावासाठी इनरव्हील क्लबतर्फे छत्रींचे वितरण


भुसावळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे विविधांगी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. त्यात घरकाम करणार्‍या महिलांकरिता निशुल्क नेत्र तपासणी शिबिर, क्लब सदस्य आणि अन्य सदस्यांसाठी सोनोग्राफी तपासणी शिबिर, दनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे नवशक्ति आर्केड येथील एका झाडाच्या पायथ्याला सुशोभीकरण करून पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला तसेच महिला पोलिस आणि महिला कर्मचार्‍यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. नवशक्ति आर्केड येथे सर्वसामान्य जनतेसाठी कट्टा तयार करण्यात आला व कुर्‍हा येथील आश्रम शाळेमध्ये सोलर लाईटचे संपूर्ण युनिट लावण्यात आल्याने आश्रमशाळेत सहा खोल्यांमध्ये सोलर लाईटवर आधरीत बल्ब लावता येतील तसेच सर्वसामान्य महिलांकरिता निशुल्क दंत तपासणी शिबिर व घरकाम करणार्‍या महिलांना चष्मे वितरण करण्यात आले तसेच भाजीबाजारात बसणार्‍या गरजू महिलांना उन्हापासून आणि पावसापासून सुरक्षित करणार्‍या छतर्‍यांचे डोनेशन करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !