पातोंडीसह भोकरी तापी नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक जोमात


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी व भोकरी येथील तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखोंचा मोठा महसूल बुडत आहे. पातोंडी येथील तापी नदी पात्रातून मुक्ताईनगर व अंतुर्ली मलकापूर, निमखेडी बु ! शहरात अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात आहे. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पथके नियुक्त केली असलीतरी या भागात अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू असल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या गंभीर प्रकाराबाबत दखल घेवून महसूल प्रशासनाने कारवाईबाबत आदेश द्यावेत, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !