भुसावळ विभागातील 13 रेल्वे कर्मचार्‍यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव


भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागातील कार्मिक विभागाच्या 13 कर्मचार्‍यांना उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व रोख दोन हजारांचा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. 9 रोजी प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी वार्षिक पुरस्कार समारोह डीआरएम कार्यालयात झाला. पाच कर्मचार्‍यांना ग्रुप अ‍ॅवॉर्ड रुपये पाच हजार देऊन सन्मानीत करण्यात आले व एका कर्मचार्‍यास एसडीजीएम अ‍ॅवॉर्ड प्रशस्तीपत्र दोन हजार रुपये देऊन सन्मानीत करण्यात आले. या सर्व कर्मचार्‍यांना पुरस्कार हा वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्याहस्ते देण्यात आले. सूत्रसंचालन मुख्य कल्याण निरीक्षक दीपा स्वामी यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक कार्मिक अधिकारी आर.एच.परदेशी, वीरेंद्र वडनेरे यांनी केले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !