अरे देवा ! : पाच रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 982 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 68 हजार 662 वर : एकाच दिवसात 512 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 982 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1432 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 68 हजार 662 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 60 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 363
जळगाव ग्रामीण 19
भुसावळ 198
अमळनेर 14
चोपडा 74
पाचोरा 30
भडगाव 01
धरणगाव 08
यावल 11
एरंडोल 04
जामनेर 40
रावेर 18
पारोळा 47
चाळीसगाव 142
मुक्ताईनगर 04
बोदवड 06
अन्य जिल्हा 03


24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 42 व 80 वर्षीय पुरूष, जळगाव तालुक्यातील 30 वर्षीय पुरूष, भुसावळ तालुक्यातील 58 वर्षीय पुरूष व चोपडा तालुक्यातील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !