महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील एस.टी.ची वाहतूक ठप्प


कोल्हापुर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळल्यानंतर दोन्ही राज्यातील एस.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे. कर्नाटकमधील एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एस.टी.बसवर दगड फेकल्याने बसच्या काचा फुटल्या आहेत. बेळगावमध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हा प्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.

हे देखील वाचा : डोकी फुटली तर दिल्लीला रडत जावू नका : खासदार संजय राऊतांचा गंभीर इशारा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !