भुसावळात फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईची संक्रांत


भुसावळ : फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ जंक्शनवर शुक्रवारी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली. त्यात 102 प्रवाशांकडून 63 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, सहाय्यक प्रबंधक आणि मुख्य तिकीट निरीक्षक अहुवालिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. त्यात 102 फुकट्या प्रवाशांकडून 63 हजार 610 रुपयांचा दंड वसूल केला. यासाठी 14 तिकीट तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !