दुचाकी-ट्रक धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुक्ताईनगर : दुचाकी व ट्रकची धडक हावून 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ घडली. अश्विन रवींद्र भालेराव (23, शेमळदे) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अश्विन हा त्याच्या दुचाकी (एम.एच.19 सी.के.8139) ने मुक्ताईनगरडे येत असताना खामखेडा पुलाजवळ समोरून येणार्या ट्रक (टी.एस.16 यू.सी.4717) ने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात अश्विन भालेराव गंभीर जखमी झाला. जळगाव येथे उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. मृत अश्विन हा मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयात बी.एसस्सीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील आर.जी.भालेराव हे रावेर पंचायत समितीत तर आई शेमळदे येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे.

