आचेगावात वीर एकलव्य जयंती उत्साहात
भुसावळ : तालुक्यातील आचेगाव येथे 11 रोजी वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीतील उपसरपंच नरेंद्र पाटील, सदस्य दीपक पाटील, आकाश झांबरे, पुंडलिक पाटील, राष्ट्रवादी युवा भुसावळ तालुका चिटणीस प्रकाश सुरवाडे, आधार सुरवाडे, महेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते जयराज पवार यांनी केले. यावेळी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
