रस्त्यांसाठी व पुलांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना आले यश : मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील रस्ते टाकणार कात
मुक्ताईनगर : रस्त्यांसाठी व पुलांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील रस्ते व पुल यासारख्या विविध विकास कामांसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकासकामांना चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिले होते. या मागणीचा राज्य सरकारने सकारात्मक विचार केला असून मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील विकास कामांसाठी निधी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या रस्त्यांचे उजळणार भाग्य
मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील मंजूरी मिळालेल्या कामांमध्ये मुक्ताईनगर तालुका अंतर्गत घोडसगाव ते रा.मा-5 जुने कुंड मुक्ताईनगर ते नवी कोथळी ते राज्यमार्ग 6 रस्ता प्रजिमा-23 किमी 9/100ते 12/500 ची सुधारणा करणे व किमी 9/600 मध्ये आरसीसी बॉक्स सेल मोरीचे बांधकाम करण्यासाठी 225 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. रावेर तालुका अंतर्गत रा.मा.45 खिरोदा-चिनावल-वडगाव-निंभोरा-बालवाडी-तांदलवाडी-हतनूर रस्ता रा.मा.46 किमी 17/400 वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी 60 लक्ष, रावेर तालुका अंतर्गत रा.मा.45 खिरोदा चिनावल-वडगाव-निंभोरा-बालवाडी-तांदलवाडी-हतनूर रस्ता रा.मा.46 किमी 17/700 वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी 70 लक्ष, बोदवड तालुका अंतर्गत कोल्हाडी निमखेड रा.मा.270 ते हरणखेड-चिखली मानूर खुर्द ते रा.मा.46 ते शेलवड रास्ता रा.मा.753 एल प्रजिमा 90 किमी 7/00 ते 20/00 ची सुधारणा, रुंदीकरण व हरणखेड गावानजीक संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी एक कोटींचा निधी मंजू करण्यात आला आहे.लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती खासदारांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

