जळगावात धाडसी घरफोडी : 14 तोळे सोन्यासह दिड लाखांची रोकड लांबवली


जळगाव (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी ठरली. बंद घराचा कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी 14 तोळे सोन्याच्या वजनाचे दागिने तसेच दिड लाखांची रोकड लांबवली. या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संगीता राजू धुगे (रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवली.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
27 ऑगस्ट रोजी रात्री साडेतीन वाजेपासून 28 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे सात लाख रुपये किमतीचे 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच एक लाख 50 हजारांची रोकड मिळून एकूण आठ लाख 50 हजारांचा ऐवज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे व अधिकार्‍यांनी भेट देवून पाहणी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. घरफोडीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !