भुसावळातील शिवदत्त नगरात राष्ट्रीय शहरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील रींग रोडवरील शिवदत्त नगरात नव्यानेच उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य केंद्राचे सोमवारी आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी नगरसवक राजेंद्र दत्तु आवटे यांच्या पुढाकारणे हे केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. या केंद्रात नागरीकांना आरोग्याच्या सुविधेसह कोविड लसही दिली जाणार आहे.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी, माजी नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, गौरव आवटे, वेद ओझा, बबलू कानूनगो, राजेश चंदन, प्रतिभा सरोदे, रामदास बैरागी, राजेंद्र सुरवाडे, डी.जी.चोपड, राजश्री सोनवणे, आशा पाटील, मनीषा वाकलकर, संध्या दामोदरे, मीना दमाडे, तसलीम पटेल, प्रियांका चौधरी, वैशाली तायडे, पद्मा पवार, ललिता आंबोरे व नगर परीषद कर्मचारी उपस्थित होते.

