नगरपालिका रुग्णालयास रक्तदाब उपकरण व टॅब्लेट भेट
भुसावळ : प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ डी.एम.ललवाणी व त्यांच्या परीवाराने स्व.स्वप्नील ललवाणी याच्या स्मृतीप्रीत्यर्थ नगरपालिका रुग्णालयास रक्तदान उपकरण व टॅब्लेट तसेच कोरोनासाठी लागणारी औषध देवून वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर व सहकार्यांचा सत्कार केला.
आरोग्य सभापतींचाही केला सन्मान
शहराच्या सफाईकडे जातीने लक्ष देणारे नवनिर्वाचीत आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांचा जैन फेडरेशनचे माजी अध्यक्ष व शहरातील नामवंत वक्ते, माजी संघपती प्रेमभाऊ कोटेचा यांच्या हस्ते तर ललवाणी परीवारावर स्नेह असणारे शहरातील पाणीपुरवठा सदैव सुरळीत रहावा म्हणुन कार्यरत असणारे पाणीपुरवठा सभापती किरण कोलते यांचा ज्येष्ठ जैन श्रावक मदनलाल ललवाणी यांच्या हस्ते शाल व मोतीमालाने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी, कमलेश निकुंभ, शोभा ललवाणी आदी उपस्थित होते.

